आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ भारतीय नेमबाज
1) ईशा सिंह
पदक व क्रीडाप्रकार:
भारताची २१ वर्षीय युवा नेमबाज ईशा सिंह हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत (नागोया) महिलांच्या २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक (Silver Medal) पटकावले.
अंतिम लढतीतील थरार:
- अंतिम फेरीत दोन्ही नेमबाज ३८ हिट्सवर बरोबरीत होते.
- तोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती चीनची नेमबाज जियारुइक्सुआन शियाओ हिने सुवर्णपदक जिंकले.
- कांस्यपदकाच्या लढतीत ईशाने दक्षिण कोरियाच्या किम ह्योन सुक विरुद्ध तीन शूट-ऑफ जिंकली.
मागील कामगिरी (हांगझोऊ २०२३)
- वैयक्तिक २५ मीटर पिस्तूलमध्ये रौप्य
- २५ मीटर पिस्तूल सांघिकमध्ये सुवर्ण
- १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक
- सांघिक प्रकारात रौप्य
II) भारतीय नेमबाजी सांघिक कामगिरी
ऐतिहासिक 'गोल्डन हॅट्रीक'
आशियाई क्रीडा स्पर्धेत (ओकाझाकी, जपान) भारतीय कंपाउंड तिरंदाजांनी तीन सांघिक फायनल्समध्ये चीनचा तिन्ही वेळा पराभव करून तीनही सुवर्णपदके पटकावली आणि निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
महिला संघ (जागतिक विक्रमाची बरोबरी):
- भारतीय संघ: ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपर्थी आणि पृथिका प्रदीप.
- अंतिम फेरीत भारताने चीनचा २३८ - २३४ (६०-५८, ५९-५८, ५९-६०, ६०-५८) असा पराभव केला.
- भारताने नोंदवलेला २३८ गुणांचा स्कोअर हा २०१४ च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत दक्षिण कोरियाने नोंदवलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी करणारा ठरला.
- ज्योती सुरेखाचे हे आशियाई स्पर्धांमधील चौथे वैयक्तिक/सांघिक सुवर्णपदक ठरले, तर चिकिता आणि पृथिकाचे हे पदार्पणातील पहिले सुवर्णपदक ठरले.
पुरुष संघ (अटीतटीचा थरार):
- भारतीय संघ: कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणी रत्नम.
- भारताने अत्यंत चुरशीच्या लढतीत चीनचा २३८ - २३७ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला.
- साताऱ्याचा तिरंदाज साहिल जाधव याने अंतिम फेरीत १००% अचूक कामगिरी करत एकही '१०' चुकवला नाही.
मिश्र सांघिक प्रकार (LA २०२८ ऑलिम्पिक कोटा)
- साताऱ्याचा साहिल जाधव आणि चिकिता तनिपर्थी यांनी दक्षिण कोरियाला रेग्युलेशन वेळेत १५७-१५७ बरोबरीनंतर शूट-ऑफमध्ये २०-१९ असे हरवून सुवर्णपदक पटकावले.
- या विजयामुळे भारताने लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ (LA 2028) साठी महत्त्वाचा ऑलिम्पिक कोटा मिळवला, जेथे कंपाउंड तिरंदाजीचा प्रथमच ऑलिम्पिकमध्ये समावेश होत आहे.
तिरंदाजांची सुवर्ण हॅट्ट्रिक
आशियाई क्रीडा स्पर्धेत (नागोया) भारतीय कंपाउंड तिरंदाजांनी मिश्र सांघिक, पुरुष सांघिक आणि महिला सांघिक अशा तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून 'सुवर्ण हॅट्ट्रिक' नोंदवली.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी पात्रता (LA 2028):
- २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कंपाउंड तिरंदाजी प्रकारातील केवळ 'मिश्र सांघिक' (Mixed Team) प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे.
- सुवर्णपदक जिंकल्यामुळे कंपाउंड तिरंदाजीत ऑलिम्पिक पात्रता मिळवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
महाराष्ट्राच्या साहिल जाधव व चिकिता तानिपार्थीचा दुहेरी दबदबा
- महाराष्ट्राचा तिरंदाज साहिल जाधव आणि चिकिता तानिपार्थी या दोघांनीही मिश्र सांघिक व आपापल्या सांघिक प्रकारात अशी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली.
- मिश्र सांघिकच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण कोरियाच्या जुंग्यून पार्क आणि चोई युन ग्यू जोडीविरुद्ध १५८-१५८ अशा बरोबरीनंतर शूट-ऑफमध्ये विजय मिळवला. (उपांत्य फेरीत भारताने थायलंडचा १५६-१४५ असा पराभव केला होता).
महिला संघाची जागतिक विक्रमाशी बरोबरी:
- ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तानिपार्थी आणि प्रतिका प्रदीप यांनी अंतिम फेरीत चीनचा २३८ - २३४ असा पराभव केला.
- या २३८ गुणांसह भारतीय महिला संघाने दक्षिण कोरियाने २०१४ च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत नोंदवलेल्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली.
III) नीरू ढांडा
ऐतिहासिक सुवर्णपदक:
२० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (ऐची-नागोया २०२६) भारताची नेमबाज नीरू ढांडा हिने महिलांच्या ट्रॅप (Trap) वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
विक्रम व महत्त्व:
- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात महिला ट्रॅप किंवा स्कीट प्रकारात वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
- अंतिम फेरीत ३० पैकी २८ अचूक नेम साधत तिने नवीन आशियाई विक्रमही प्रस्थापित केला.
- तिने चीनच्या सुन युनिंग (२६ गुण - रौप्य) आणि कुवेतच्या अब्दुलमलिक हाजर (२१ गुण - कांस्य) यांना मागे टाकले.
४८ वर्षांची प्रतीक्षा संपवली
ट्रॅप प्रकारातील भारताचे हे ४८ वर्षांनंतरचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक आहे. यापूर्वी १९७८ मध्ये रणधीर सिंग यांनी पुरुष ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. (तसेच २०१० मध्ये रंजन सोढी यांनी पुरुष डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण जिंकले होते).
सांघिक रौप्यपदक:
वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याच्या काही तास आधी नीरू ढांडा (११८ गुण), आशिमा अहलावत (१०६ गुण) आणि मनीषा कीर (१०४ गुण) या भारतीय संघाने एकूण ३२८ गुणांसह सांघिक रौप्यपदक पटकावले.
वैयक्तिक पार्श्वभूमी:
- हरियाणामधील जींद येथील रहिवासी असलेली नीरू ढांडा ही भारतीय लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहे.
- स्पर्धेच्या अवघ्या १० दिवस आधी ती तीव्र फ्लू आणि H5N1 च्या शक्यतेने आजारी होती व भोपाळमधील रुग्णालयात दाखल होती.